महिला शिक्षण दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ३ जानेवारीला होणार गौरव

जळगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याच्या गौरवार्थ महिला शिक्षणदिन साजरा करण्याचे घोषित केले आहे . त्यानिमित्ताने उपक्रमशील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे व्रत घेतलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करणार आहेत. 

सदरहू सत्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल देऊन सभारंभपूर्वक गौरविण्यात येईल .पुरस्कार वितरण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ३ जानेवारी २०२१ रविवारी दुपारी बारा वाजता पर्यावरण शाळा,जळगाव येथे सहाय्यक सरकारी वकील ॲड.सौ. अनुराधा वाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार,प्रा.सोपान बोराटे, प्रकाश शिरसाठ,अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी,जळगाव जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील आदीची उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण दिनाच्या औचित्याने “महिलांचे आरोग्य आणि सामाजिक समस्या ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

या कार्यक्रमात कर्तृत्ववान पुरस्कारार्थी महिला :-  शैक्षणिक क्षेत्र :- अरुणा उदावंत ( पाचोरा ), प्रभावती बावस्कर, वर्षा अहिरराव, छाया पाटील (किनगाव ) सामाजिक क्षेत्र : – सुश्मिता भालेराव,वैशाली विसपुते, मिनाक्षी निकम (चाळीसगाव ),सरीता नेरकर, हर्षाली पाटील, मनिषा मेथाळकर राजकिय- नगरसेविका सरीता नेरकर, मंगला बारी, वैद्यकिय- कविता नेतकर सहकार- सौ. सावित्री सोळुंके,सौ . स्वाती भावसार पत्रकारीता- धनश्री बागुल , नाजनीन शेख पोलिस – यशोदा कणसे., प्रकाशन- संगिता माळी आदींचा सत्कारार्थींमध्ये समावेश आहे .असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये संयोजक विजय लुल्हे यांनी कळविले आहे .

 

Protected Content