यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा पर्वत रांगेत असलेल्पा विश्राम जिन्सी तालुका रावेर या आदिवासी गावात महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशन यावलच्या माध्यमातून शालेय साहित्य वितरणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी आश्रय फाऊंडेशन या समाजसेवी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या तर्फे देवा भाऊ सेवा पर्व सुरु करण्यात आला.
यात देवा भाऊ की पाठशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्रात लहान मुलांना अभ्यासाची, वाचनाची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पड्यांवर वर्ग भरविले जाणार असुन तसेच आज २५० विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, वृक्षारोपण या सारखे अनेक उपक्रम मा ना श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकर फेगडे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणा करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना स्कुल बॅगसह शालेय साहित्य वाटप करण्यात आलीत, यावेळी ऑल विज वेल या रूग्णालयाचे डॉ सचिन महाजन यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास विश्राम जिन्सी ग्रामपंचायतचे सरपंच चरणसिंग पवार, उपसरपंच रेवाबाई पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ पवार, धनलाला पवार, कांतीलाल पवार ,राजु पवार, शिवाजी पवार, अमर सिंग पवार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उदय पाटील यांनी मानले .