पारोळा प्रतिनिधी | तेली समाजाचे आराध्य दैवत ग्रंथकार श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश तेली महासंघ व युवक महासंघ वतीने पारोळा तालुक्यातील तेली समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम पारोळा नवे तेली भुवन येथे संपन्न झाला.
राष्ट्रीय महामार्ग ६ वरील नव्या तेली भवनात सोमवार, दि. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रमास सुरुवात तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गुणवंत विद्यार्थांच्या प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यांत आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण शीरसागर, प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष-के.डी.चौधरी, जिल्हा महिलाध्यक्ष – निर्मला चौधरी, अमळनेर नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष-अबू महाजन, नगरसेवक-पंकज चौधरी, जळगांव-श्री.रामचंद्र, जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, रुपाली चौधरी यासह विविध पदाधिकारी आणि कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केलेले विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी आमदार-शिरीश चौधरी यांनी, “समाज बांधवांना संघटित राहून समाजाच्या विकासाकडे भर देतांना नोकरी न करता दुसऱ्यांना नोकरी द्या अये सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलीचं प्रमाण जास्त आहे याकडे लक्ष वेधत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करुन नाव लौकिक मिळवावे” असे त्यांनी सांगितेले.
८०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष भागवत चौधरी, शहराध्यक्ष प्रवीण चौधरी व नगरसेवक नवल नामदेव चौधरी, नगरसेवक-कैलास चौधरी, प्रहाद चौधरी, अरुण चौधरी, नगरसेवक व अध्यक्ष महेश चौधरी, भरत चौधरी, भैय्या चौधरी, नवल चौधरी, अनिल जयराम, माजी समाजाध्यक्ष वामन चौधरी, समाजसेवक साहेबराव ठाकरे व कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले .