कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त “स्मरण बहिणाईचे” कार्यक्रमातून उजाळा

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगावात असलेल्या चौधरी वाडा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी “स्मरण बहिणाईचे” अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात येवून त्यांनी लिहिलेल्या कवितांना उजाळा देण्यात आला.

जुने जळगावातील चौधरीवाडा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी त्या काळातील वारलेले साहित्य आजही त्याच घरात अगदी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले आहे. खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या अनुंषंगाने जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांनी त्यांच्या आठवणीतील वांगमय साहित्यांची जोपासना करण्यासाठी बहिणाबाई स्मृती भवनाची निर्मीती करण्यात आली. याठिकाणी बहिणाबाईंची पुस्तकं, बहिणाबाईंचं घर, तसेच त्यांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तूंच सुंदर स्मारक करण्यात आले आहे.

मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त चौधरी वाडा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त “स्मरण बहिणाईंचे” असा कार्यक्रम घेवून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे संजय चौधरी, नहाटा कॉलेजच्या प्रा. वंदना नेमाडे, साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्या विमलताई वाणी, बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content