गुरुपौर्णिमेनिमित्त श्री निष्कलंक धाम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । २१ जुलै २०२४ गुरुपौर्णिमेनिमित्त येथील सतपंथ मंदिर संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सतपंथ मंदिर संस्थान फैजपूर येथे सकाळी ५.०० वाजता कलश महापूजा व गुरुदीक्षा कार्यक्रम संपन्न होईल तर सतपंथ चारिटेबल ट्रस्ट निर्मित श्री निष्कलंक धाम वढोदे येथे सकाळी ९-०० वाजता महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या मधुर वाणीतून गुरुपौर्णिमा सत्संग, ११-०० वाजता दर्शन आणि ११-०० ते २-०० भाविकांसाठी महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ मंदिर संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल असे आवाहन मंदिर संस्थानच्या ट्रष्टीनी केले आहे.

Protected Content