Home Cities धरणगाव ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप व स्वर्गरथाचे लोकार्पण

ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप व स्वर्गरथाचे लोकार्पण



धरणगाव (प्रतिनिधी) सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 4 जून रोजी पदमश्री भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय संचलित छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय मराठे गल्लीतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ना.पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शहरासाठी अंत्ययात्रेत लागणाऱ्या स्वर्गरथा लोकार्पण होणार आहे.

 

वह्या वाटपाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजेला होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, उपनगराध्यक्ष भानुदासजी विसावे,भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, शिरीष बयस, गटनेते पप्पू भावे, भाजप गटनेते गटनेते कैलास माळी, दिलीप मराठे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, सुनील वाणी सर्व सन्मानीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष दिपक पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound