पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेल्या विनोद धनराज पाटील (वय – ५२) यांच्यावर मकरसंक्रातीच्या दिवशीच काळाची क्रूर झडप पडली आहे. विनोद पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दुदैवी मृत्यू झाला.
विनोद पाटील हे २५ वर्षांपासून नोकरीनिमित्त कल्याण येथील गजानन माध्यमिक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची सेवानिवृत्तीची पाच वर्ष बाकी होती. ते १३ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरत येथील सासऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त भेटण्यासाठी कल्याणवरून रेल्वेने पत्नी व मुलासोबत गेले होते. १४ जानेवारी रोजी दीड वाजता सासऱ्याच्या घरी पोहचले असता त्यांना सकाळी नऊ वाजात छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांन तत्काळ त्यांचे मेहुण्यांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर ताबडतोब त्यांना मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना त्वरीत ऑपरेशन करयाचा सल्ला दिला.
त्यानंतर डॉक्टर ऑपरेशनची तयारी करत असताना त्यांचा दूदैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या मुळगावी कुरंगी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते अशोक जैन यांच्या गाडीचे चालक दिनकर पाटील, कुरंगी गावचे माजी उपसरपंच गुलाब पाटील यांचे चुलत बंधू होते. त्यांचेवर १५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कुरंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.