नगरसेवक ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त मंदिराच्या कामाचे भूमिपूजन (व्हिडीओ)

nagarsevak

भुसावळ प्रतिनिधी । येथील वार्ड क्रमांक २०चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचा आज (दि.१८) वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दत्त मंदिराच्या सरंक्षण भिंतीचे नवनिर्माण व सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामनगर, दत्तनगर, गुंडेवाडी आणि निवृत्ती नगर या भागामध्ये विकास कामे न झाल्यास नगरसेवक पिंटू कोठारी व नगरसेवक पिंटू ठाकूर हे आगामी निवडणूकीत मत मागण्यासाठी जनतेसमोर न जाण्याच्या प्रवित्रा घेतला आहे. या भागात विकास कामे होत नसल्याने संतप्त होऊन त्यांनी असा इशारा यावेळी दिला.

याप्रसंगी आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रंमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक दिनेश नेमाडे, नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक वंसत पाटील, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक बोधराज चौधरी, मुकेश गुंजाळ, आप्पा सोनवणे आणि दत्तनगर फाऊंडेशनचे अध्यक्ष, कार्यकर्ते आकाश राजपूत, किशोर पाटील, रविंद्र पाटील, रुपेश पातोळे, आविनाश सोनवणे, आरुन धनगर, बिका परदेशी, रवी ढगे, पिंटू भारबे, राजेश ठाकूर, सागर इंगळे, संदिप पाटील, बिना सपकाळे, जितू पाटील, भुषण पाटील, गजू पाटील, लोकेश बेंडाळे, लोकेश पाटील, भुषण ऊगले, अजय भारंबे, प्रतिक कावळे, चिनमय फेगळे, सौरभ सावळे, पप्पू सावळे, समिर पाटील, विक्की ठाकुर आणि संजय ठाकूर हे उपस्थितीत होते.

Protected Content