गिरणा नदीच्या काठावर दोन गावठी हातभट्टीची अड्डे उद्धवस्त

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावालगत असलेल्या गिरणा नदीच्या काठावर दोन गावठी हातभट्टीची अड्डे तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत उद्धवस्त केले. या दोन्ही ठिकाणाहून हातभट्टीची दारु, रसायन व दारु तयार करण्याचे साहित्य असा एकूण १२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील दापोरा गावालगत असलेल्या गिरणा नदीपात्रालगत झाडाझुडपांच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची माहिती परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यांनी लागलीच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भूषण सपकाळे, रामकृष्ण इंगळे, शाम पाटील, अनिल मोरे यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी दारु तयार करणाऱ्या संशयित भिमराव एकनाथ मोरे (वय ४६, रा. दापोरा ता. जळगाव) याला ताब्यात घेतले असून त्याठिकाणाहून सुमारे ६ हजारांची दारु व दारु तयार करण्याचे रसायन आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर दुसऱ्या कारवाईत दापोरा गावाजवळील कोरखूण नाल्याजवळ हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या धनराज फुलसिंग पवार (वय- ४८, रा. दापोरा) हा दारु करतांना त्याच्यावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. याच्याकडून देखील ६ हजारांची गावठी हातभट्टीची दारु व साहित्य जप्त करण्यात आले असून त्याच्याविरूद्ध देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पेालीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Protected Content