जळगाव (प्रतिनिधी) विद्युत यंत्रणेच्या तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी जळगाव, पाचोरा, सावदा, दोंडाईचा, धुळे शहर व शहादा विभागात काही उपकेंद्रे व वाहिन्यांचा वीजपुरवठा शनिवार दि. 04 मे, 2019 रोजी पाच ते सात तास बंद राहणार आहे. वेळेच्या आत कामे पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा त्वरीत सुरु करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील 33/11 केव्ही विदगांव उपकेंद्रावरील असोदा, भादली बु||, सुजदे, भोलाणे, देऊळवाडे, शेलगांव,कानसवाडे, ममुराबाद, विदगाव, डिकसाई, रीधुर, घार्दी. अमोदा बु||, धामणगाव, आवार, तुरखेडा व लगतचा परिसराचा वीजपुरवठा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच 33/11 केव्ही नशिराबाद उपकेंद्रावरील नशिराबाद, मन्यारखेडा, तरसोद, बेली, भागपुर, निमगाव, जळगाव खु||, खिर्डी, तिघ्रे व लगतचा परिसराचा वीजपुरवठा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पाचोरा तालुक्यात 11 केव्ही पांडव नगरी, निर्मल, अंतुर्ली, पुनगांव या वीज वाहिन्यांवरील पाचोरा शहर, निर्मलगाव, अंतुर्ली, पुनगांव व लगतचा परिसराचा वीजपुरवठा सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच 33/11 केव्ही बनोटी उपकेंद्रावरील 11 के. व्ही. तारखेडा शेती, तारखेडा गावठान, हनुमाननगर शेती या वीज वाहिन्यावरील वीजपुरवठा सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
सावदा येथे 132 के.व्हि. रावेर उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 के.व्ही. पाल शेती, 11 के.व्ही. अहिरवाडी शेती, 11 के.व्ही. केऱ्हाळा शेती या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
धुळे शहरातील विद्युत वाहिनीस अडसर ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छटाईसाठी व तांत्रिक देखभाल- दुरूस्तीच्या कामासाठी 11 केव्ही दत्तमंदिर, राजवाडे, सिव्हील, विद्यानगरी या फिडरवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच चाळीसगाव ते धुळे रेल्वे लाईन मध्ये भुमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी 33 के.व्ही. कृषी विद्यालय, 33 के.व्ही. फागणे, 33 के.व्ही. गोंदूर व 33 के.व्ही. आर्वी (जुनवणे) या उपकेंद्रांवरील सर्व 11 केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
दोंडाईचा – 33/11 के.व्ही. दोंडाईचा उपकेंद्रावरील सर्व 11 केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी 08.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहादा – 33/11 के.व्ही. प्रतापपूर उपकेंद्रावरील सर्व 11 केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.