‘प्रपोज डे’ला तरूणाचा प्रेमभंग अन् तरूणीसमोरच कापली हाताची नस

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने  ’प्रपोज डे’ च्या दिवशी तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना फुले मार्केटमध्ये घडली. यामुळे मार्केट परिसरात चांगलाच खळबळ उडाली होती.

 

जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे फुले मार्केट परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

Protected Content