यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अकलुद येथे १७ मार्च रोजी रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत शिरीष चौधरी माध्यमिक विद्यालयात आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने वधु वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा कोळी समाज विकास मंच माध्यमातून आदिवासी कोळी समाजाचा उपवर वधू- वर परीचय मेळावा व युवा महोत्सव २०२४ आ.रमेश पाटील यांच्या अध्यस्थांनी राहणार असून कार्यक्रमाचे उदघाटन मत्री दशरथजी भांडे करणार आहे.
या कार्यक्रमात समाजसेवक शांताराम सोनवणे जळगाव, जिल्हा परिषद माजी सभापती प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.दिलीप सुर्यवंशी, आदिवासी कोळी समाज समन्वय समीतीचे जितेद्र सपकाळे, उद्योगपती रामचंद्र सोनवणे यांच्या प्रेरणातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकारी, खासदार, आमदार, आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती सह समाज बांधव उपस्थित राहणार आहे.
उपवर वधु – वर, घटस्फोट झालेली वधु- वर सह समाज बाधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य आयोजक नारायण कोळी, विकास सपकाळे, बंडु कोळी, सुभाष सोनवणे, डॉ. स्वप्निल सोळंके, दिलीप कोळी, भरत कोळी, गोकुळ तायडे, नितीन कोळी, चद्रकांत कोळी, शरद तायडे, नितीन सोनवणे, प्रदिप सोनवणे, सागर सोनवणे, धनराज सपकाळे, राहुल तायडे, योगराज सोनवणे, खेमचंद कोळी, नितीन सपकाळे, तुसार कोळी, राजु कोळी, गजानन चिखले, दिपक तायडे, संजय सपकाळे यांनी तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधवाना केले आहे.