‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेतर्गंत आ.राजुमामा भोळेंच्या हस्ते मोफत रोपांचे वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोप मोफत वाटपाचा कार्यक्रम आ.राजुमामा भोळे यांच्या व उपव संरक्षक जमीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावल वनविभाग व जळगाव रेल्वे स्टेशन परिसर भागात मोफत रोप वाटप करण्यात आले.

यावल वनविभाग आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत १९ जुलै २०२४ रोजी मोफत रोपवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे होते. कार्यक्रमामध्ये फळझाडांची तसेच इतर प्रकारच्या झाडांची रोपे वाटप करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावल वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच, सहभागी नागरिकांना रोपांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. उपस्थितांनी रोपे स्वीकारून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानले जात आहेत. कार्यक्रम विशेष उपस्थिती म्हणून जळगावचे आ. राजूमामा भोळे व सहायक वन संरक्षक प्रथमेश हडपे सर यांनी उपस्थिताना रोपे व माहिती दिले वन परीशेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे व सुनील भिलावे यांनी सुद्धा उपस्थिताना रोपे वाटप केली. या कार्यक्रमाचे प्रेरक म्हणून जमीर शेख सर उप वन संरक्षक यांनी कार्यक्रमास म्हत्वाचे मार्गदर्शन केले .

Protected Content