Home धर्म-समाज रेल कामगारांच्या वतीने ना. ग़ुलाबराव पाटील यांची DRM गुप्तांशी चर्चा

रेल कामगारांच्या वतीने ना. ग़ुलाबराव पाटील यांची DRM गुप्तांशी चर्चा


bhusaval bhet

भुसावळ, प्रतिनिधी | येथील DRM कार्यालयात आज (दि.११) रेल्वे कामगारांच्या विविध व ज्वलंत समस्यांसंदर्भात ना. ग़ुलाबराव पाटील यांनी DRM गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली.

 

ना. पाटील यांनी DRM गुप्ता यांना ठणकावून सांगितले की, रेल कामगार सेनेच्या ज्या समस्या असतील त्या काळजीपुर्वक लक्ष देवून लवकरात लवकर सोड़वाव्या. यावर DRM गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व येत्या काही दिवसात रेल कामगार सेनेला चर्चेसाठी बोलावेन असे आश्वासन दिले.

यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललीत कुमार मुथा, प्रीतम टाक, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, संजय जगन्नाथ चौधरी, नरेश शर्मा, विजय तायड़े, सुरेंद्र यादव, पदमानंद तायड़े , महेंद्र सोनवणे, महेश पाटील, शेख शब्बीर, अब्दुल अजीज व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound