Home Cities जळगाव मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
31

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवी पेठेत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समाजसेविका निवेदिता ताठे तसेच पत्रकार शरद भालेराव यांच्याहस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शाह बिरादरीचे अध्यक्ष अजमल शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी व समाजात केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणार्‍या समाजसेविका निवेदिता ताठे व अभेद्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे, कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के यांना अजमल शाह यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, अजमल शाह, निवेदिता ताठे, अ‍ॅड.राज देशमुख, जेसीआय झोनचे उपाध्यक्ष जिनल जैन, जेसीआय झोनचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के, अभेद्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.


Protected Content

Play sound