श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे गांदरबल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. श्रीनगरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी नुनेर येथील निवडणूक सभेत ही घोषणा केली. ओमर अब्दुल्लाही येथे उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. त्यामुळे यादी तयार होण्यास विलंब होत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने २२ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ९० जागांवर युतीची घोषणा केली होती. काही जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चुरस आहे. याबाबत दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.