उल्हासनगर मतदारसंघातून ओम कलानी शरद पवार गटाचे उमेदवार

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत उल्हासनगरातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वैयक्तिक पाठिंबा देत मैत्रीची युती असे जाहीरपणे सांगणाऱ्या आणि भाजपला विरोध करणाऱ्या टीम ओमी कलानीने आपल्या गोव्याच्या कार्यकारिणी बैठकीत ओमी कलानी यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओमी कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात असतील. पप्पू कलानी, ज्योती कलानी यांच्यानंतर निवडणुकीत उतरणारे ओमी कलानी तिसरे कलानी ठरणार आहेत. गोव्यातल्या बैठकीत १८ सदस्यीय समितीचीही घोषणा करण्यात आली असून त्यात स्वतः पप्पू कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह कलानी यांचे जुने साथीदार, विविध संघटनांचे प्रमुख यात आहेत.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी कलानी कुटुंबियांचा वरचष्मा असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. कुमार आयलानी यांनी भाजपच्या माध्यमातून त्याला छेद देत आमदारकी मिळवली. मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांचा अवघ्या २००४ मतांनी निसटता विजय झाला. त्यांनी ज्योती कलानी यांचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या टीम ओमी कलानी आणि भाजपने फारकत घेतली.

Protected Content