नूतन महाविद्यालयात लागलेल्या आगीत जूने दस्ताऐवज जळून खाक

0aag 4

जळगाव (प्रतिनिधी)। नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने लागलेल्या या आगीत परीक्षा विभागासह जुने रेकॉड रूम, लेडीज रेस्ट रूमला आग लागून जुने दस्ताऐवज, उत्तरपत्रिका आदी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

 

परिक्षा विभागात असलेल्या कागदांना लागलेली आग अग्निशमन दलाच्या बंबाने आटोक्‍यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान महाविद्यालयाच्या परिक्षा विभागाला लागलेली आग ही शॉकसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज प्राचार्य एल. पी. देशमुख यांनी सांगितले. पंचनाम्यासाठी पोलिस याठिकाणी आले होते.

Add Comment

Protected Content