Home क्राईम वृद्धाचे बंद फोडून 73 हजारांचा ऐवज लांबविला

वृद्धाचे बंद फोडून 73 हजारांचा ऐवज लांबविला


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील विनायक कॉलनी येथे राहणाऱ्या एका वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमनाथ शिवचरण दास गिनोत्रा (वय 68 रा.विनायक कॉलनी भुसावळ) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. 2 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना आज्ञा चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता समोर आली. दरम्यान या संदर्भात प्रेमनाथ गीनोत्रा यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound