भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील एका वृध्दाला चोरीचा संशय घेत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रशिद गुलजार पिंजारी (वय ६१) रा. निंभोरा ता.भुसावळ हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी विनोद चंदू सोनवणे आणि रूपेश चंदु सोनवणे दोन्ही रा. जाडगाव यांनी रशिद पिंजारी यांच्यावर रिक्षाचे टायर चोरी केल्याचा आरोप करत त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रशिद पिंजारी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे विनोद चंदू सोनवणे आणि रूपेश चंदु सोनवणे दोन्ही रा. जाडगाव दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री चौधरी हे करीत आहे.