Home Cities जळगाव माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्राचे जळगाव बाजार समितीत अनावरण !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्राचे जळगाव बाजार समितीत अनावरण !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आणि राजकीय इतिहासाला दिशा देणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, बुधवारी (दि. १ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे माजी महापौर नितीन लड्डा आणि बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी महापौर नितीन लड्डा म्हणाले, “सुरेशदादा जैन हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले विकासाचे शिल्पकार होते. त्यांनी सलग ३० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुनील महाजन यांनी राजकारणात कामाला सुरुवात केली. आज त्यांनी दादांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी तैलचित्र लावण्याचा जो सर्वानुमते निर्णय घेतला, तो अत्यंत कौतुकास्पद आहे.”

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सभापती सुनील महाजन म्हणाले, “सुरेशदादांच्या नेतृत्वातच एकेकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली होती. मात्र, काही कारणास्तव दादांचे चित्र येथे लावण्याचे राहून गेले होते. ही बाब विद्यमान संचालक मंडळाच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने हा निर्णय घेतला. मी स्वतः अनेक वर्षे दादांच्या नेतृत्वात काम करत आहे. ज्यांनी मला घडवले, त्यांचे तैलचित्र माझ्या कार्यकाळात लावण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला मनस्वी आनंद आहे. दादा हेच आमचे आदर्श आहेत आणि यापुढेही राहतील.”


Protected Content

Play sound