जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमधील एका ऑईल कंपनीला शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना आज मंगळवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचवून ही आग आटोक्यात आणली. या आगीची पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.
अग्निशमन विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील के- सेक्टर भागात असलेल्या नेहा इंडस्ट्रीज के-८२/१ या ऑईल कंपनीला आज मंगळवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे मेन्टानन्स विभागातील ऑईल हॅडला अचानक आग लागली. यावेळी आगीत ऑईल हॅण्ड जळून खाक झाले आहे. यात कुणालाही दुखापत झालेली नाही. आग लागल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. अवघ्या ३० मिनीटात अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप कळालेले नाही. एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रात्री उशीरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आग विझविण्यासाठी वाहन चालक प्रकाश चव्हाण, पन्नालाल सोनवणे, गंगाधर कोळी, सोपान जाधव, नितीन बारी व नेहा इंडस्ट्रीज कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/871720883531507