जळगावात भुमापक अधिकाऱ्याला मारहाण ; एका विरुद्ध गुन्हा

marhan tayar

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नगर भुमापक उपअधीक्षक कार्यालयात भुमापक म्हणुन कार्यरत अधीकाऱ्याला कार्यालयात शिरुन बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

शहरातील नगर भुमापक उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत प्रफुल्ल माणिकराव पाटील (वय-35) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कार्यालयात बुधवारी संध्याकाळी राजा भगवान सोनवणे हा काहीएक काम नसतांना आला. यावेळी कार्यालयीन कामात व्यस्त कृष्णा जनार्दन भट यांच्याशी विनाकारण वाद घालून हुज्जत घातली. यावेळी प्रफुल्ल पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना राजा सोनवणे याने चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण करुन टेबलावरील संगणक उचलून डोक्‍यात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर सहकाऱ्यांनी त्याला पकडल्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर राजा सोनवणे हा सर्वांना शिवीगाळ करुन घरात घुसून मारहाण करण्याचे सांगत दमदाटी करीत निघून गेला. जातांना पोलिसांना तक्रार केली तर ऍट्रासीटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली. प्रफुल्ल पाठक व सहकाऱ्यांनी आज पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून राजा भगवान सोनवणे याच्या विरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण करुन शासकिय नोकरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक संदिप अराक तपास करीत आहेत.

Protected Content