Home क्राईम संदल मिरवणूकीत आक्षेपार्ह कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संदल मिरवणूकीत आक्षेपार्ह कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा येथे हुरे मलंग बाबा उरूसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संदल मिरवणुकीत आक्षेपार्ह क्लिप वाजवून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार २३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. या प्रकरणी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, हुरे मलंग बाबा उरूसाच्या निमित्ताने २३ जानेवारी रोजी रात्री तांबापूरा येथे संदल मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. आशरफ शेख शकील (रा. तांबापूरा) यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीदरम्यान, योगेंद्र पाटील (रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या जय चैतन्य नावाच्या डी.जे.वर आक्षेपार्ह क्लिप वाजविण्यात आली. तसेच, संशयित आरोपी शेख मुजाहित शेख जाकीर यांनी आक्षेपार्ह फोटो मिरवणुकीत नाचून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत, शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound