ओबीसी आरक्षण : ‘इम्पेरीकल डेटा’बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समर्पित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरिकल डेटा सदोष पध्दतीने होत असल्याने चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना बुधवार १५ जून रोजी दुपारी १२ वाजता  निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यास बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठीत करण्यात आले आहे. आयोगाने न्यायालयाच्या अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. परंतु सदरील आयोग निर्देशाप्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे. अशा प्रकारे समस्त ओबीसी समाजाची

फसवणूक होत आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. तरी समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज

तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासना मार्फत सर्वोच न्यायालयासमोर ठेवण्यात यावे, अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

 

या निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, हेमरत्न काळुंखे, नितीन महाजन, अमोल कोल्हे, प्रकाश बाविस्कर, शैलेंद्र परदेशी, मनोज महाजन, दिलीप पाटील, गोपाळ सोनवणे, नाना पाटील, काशिनाथ भोई, गणेश कोळी, गणेश महाजन, अतुल हराळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content