जळगावात होणार ओबीसी एल्गार महामेळावा (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि आरक्षण व जनगणनेसाठी २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मानराज पार्क, जळगाव येथे एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यास संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या महामेळाव्यात ओबीसी आरक्षण आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना हे दोन महत्त्वाचे मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत. १९३१ पासून ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना झालेली नाही, यामुळे विविध सामाजिक आणि शैक्षणिक योजनांमध्ये ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही. महामेळाव्यात या मागणीचा बुलंद आवाज उठवला जाणार आहे.

छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्ष केला आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत ओबीसी चळवळीसाठी मैदानात उतरून नेतृत्व केले आहे. विरोधक आरोप करत असले तरी भुजबळ यांच्या सामाजिक लढ्याला ओबीसी बांधवांचा पाठिंबा असून, हा महामेळावा त्याचा एक भाग आहे. या महामेळाव्यासाठी बारा बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना त्वरीत करावी. आरक्षण टिकवण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. ओबीसी समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या नेत्यांना न्याय द्यावा. अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहे. ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :

Protected Content