मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला होता. हे सरकार या आरक्षणासंदर्भात गाफील असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, तर आम्ही पुरेपुर प्रयत्न करत असून कायदेशीर बाबींमुळे या अडचणी येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. आपण दोन्ही बाजूंनी ओबीसींसाठी पुन्हा प्रयत्न करु. आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, हे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पर्शवभूमीवर, आज विधानसभेत ओबीसी आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करून मगच निवडणुका घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल हे सुध्दा अधोरेखीत झाले आहे.