जळगाव (प्रतिनिधी ) के.सी.ई सोसायटीच्या ओरियन सी.बी.एस.सी इंग्लिश मिडीयम नर्सरी स्कूलमधील विदयार्थांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थी शाळेच्या वातावरणात रममान व्हावे तसेच खेळीमेळीचे वातावरण तयार व्हावे यासाठी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय बनावा यासाठी उपक्रम राबविण्यात आला.
प्रत्येक वर्षी ओरियन सीबीएससी स्कूलमार्फत अनेक नवनवीन संकल्पनांवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात. त्या अनुषंगाने यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविला. सकाळी थोड्या रडक्या चेहऱ्याने आलेले विद्यार्थी थोड्या वेळातच शाळेच्या वातावरणात रमले. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्या माधवी सीट्रा यांनी स्वत: मायेने विचारपूस करत त्यांना वर्गात नेऊन बसवले. प्रत्येक विद्यार्थ्याला घरी जाताना आवळा ,बांबू , चिंच, कडूनिंब , बाबुल , आपटा बादाम जांभूळ, कण्हेर या प्रकारच्या विविध वृक्षांची रोपटी देण्यात आली व त्यांची काळजी घेण्याची सूचना देखील करण्यात आली. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी जागृती निर्माण व्हावी व पर्यावरण संवर्धनात त्यांचा खारीचा वाटा असावा हा त्या मागचा उद्देश होता. विद्यार्थी आपल्या पुढील आयुष्यात जसे जसे मार्गक्रमन करतील तस तसे रोपटे देखील उंच वृक्षांमध्ये बदलतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यसाठी शाळेच्या प्राचार्या , उपप्राचार्या तसेच शिक्षकानी मन :पूर्वक शुभेच्या दिल्या आणि तसेच या उपक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.