नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज संसदेत संपूर्ण देशात एनआरसी लागू केली जाईल, असे जाहीर केले. तसेच, कोण्यात एका धर्मातील नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
गृहमंत्र्यांनी म्हटले की, एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव होणार नाही. इतर धर्माच्या लोकांना यामध्ये समाविष्ट केले जाऊ नये अशा प्रकारचा कोणताही नियम यामध्ये नाही. कोणत्याही धर्माचे लोक एनआरसीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. एनआरसी आणि नागरिकता दुरुस्ती विधेयक या भिन्न प्रक्रिया आहेत. यांना एकमेकांसोबत जोडले जाऊ शकत नाही. शाह पुढे म्हणाले की, एनआरसी मध्ये धर्माच्या आधारे लोकांना बाहेर करण्याचा कोणता विचार नाही. जर कोणाचे नाव एनआरसीमधून बाहेर केले असेल, तर त्यांना ट्रिब्यूनलमध्ये अर्ज करण्याचा अधिकार आहे. जर कोणाकडे यासाठी पैसे नसतील, तर असाम सरकार त्यांच्यासाठी वकीलाची सोय करतील. असाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात आले आहे.