मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा बजेट विधीमंडळात सादर केले आहे. त्यात त्यांनी पहिलीच योजनेच्या घोषणेत वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. यात प्रती दिंडी शासनाकडून २० हजार मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याची तरतूद अतिरिक्त बजेटमध्ये केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या. देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली. उद्या आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघेल. महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.
२०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे,. मोफत औषध देणार आहोत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजितदादांनी यावेळी केली. अजितदादांनी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याने आणि मोफत औषध देण्यात येणार असल्याने वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आजपासुन उपहार गृह सुरू करण्यात आले आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये माफक दरात जेवण मिळणार आहे. भाविकांना उपहारगृहात फक्त शंभर रुपयात पोटभर जेवण मिळेल.