नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्ट जुलै महिन्या अखेरपासून सर्व निकाल आपल्या अधिकृत वेबसाईटवर सहा क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. मागील कित्येक दिवसापासून सुप्रीम कोर्टाचे निकाल क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने या संदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार विद्यमान परंपरेनुसार निकाल हे इंग्रजीत लिहिले जातात आणि कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड होतात. निकाल क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रमुख कारण म्हणजे याचिका कर्त्याला वकीलाशिवाय देखील निकाल समजू शकला पाहिजे. त्यानुसार आता सुरुवातीला हिंदी असमिया, कन्नड़, मराठी, उडिया आणि तेलगूचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्री अधिकारिऱ्यांनी सांगितले की, मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सुप्रीम कोर्टाची अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेयर शाखेद्वारा तयार स्वदेशी विकसित सॉफ्टवेयरच्या वापरास मंजुरी दिली आहे.