मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आता यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे.
विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्यात सामना दिसून आला. मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप झाल्यापासून दरेकर यांनी साखर कारखान्यांना निशाना साधून आरोप करण्यात येत आहे. दरम्यान साखर कारखान्यांना दिलेली कर्ज बेकायदेशी असल्याचा आरोप भाजपा कडून होत आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री पवार यांनी यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही अशी मोठी घोषणा केली.
पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व प्रकारचे सहकारी नियम पाळूनच कारखान्यांना मदत करण्याचे सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही आज असो अथवा उद्या नसो परंतु सहकारी संस्था कायम स्वरूपी मजबूत राहील्या पाहीजेत, मधल्या काळात सहकारी कारखान्यां संदर्भात आरोप केले गेले, परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावर्षी देशात राज्याने साखरेची विकमी निर्यात केली, आम्ही जे चांगले झाले ते चांगलेच म्हणणार, असेही ते म्हणाले.