नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू करण्यात आला असून आज केंद्र सरकारने याची अधिसूचना काढली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आजपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे. तथापि, विरोध सुरू असतांनाच केंद्र सरकारने याला आता देशभरात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.