सुशांतच्या कुटुंबाकडून माफीनाम्यासाठी संजय राऊत यांना नोटीस

मुंबई वृत्तसंस्था । सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येबद्दल खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. आता, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

 

आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले. सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपामुळे भडकलेल्या सुशांतच्या कुटुंबाने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. आता संजय राऊत यांना सुशांतच्या चुलत भावानं नोटीस पाठवली आहे. ‘तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

‘ संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळं आमच्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू यानं नोटीस बजावली आहे. आपल्या ‘वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ४८ तासांत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा इशाराचा बबलू यानी खासदार संजय राऊत यांना दिलाय.

सुशांतच्या वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.

Protected Content