
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई आयकर विभागाने प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि त्यांच्या तीन मुलांच्या नावाने ‘ब्लॅक मनी अॅक्ट 2015’ मधील तरतुदींनुसार नोटीस पाठवली आहे. दरम्यान, या नोटीसीमुळे उद्योग जगतात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
एचएसबीसी जिनिव्हामध्ये 2011 मध्ये अंदाजे 700 भारतीय व्यक्ती आणि सस्थांची खाती असल्याची माहिती सरकारला मिळाल्यानंतर आयकर विभागाने चौकशीला सुरूवात केली होती. यानंतर 2015 मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ यांनी मिळून एक तपास सुरू केला. या तपासाला ‘स्विस लिक्स’ या नावाने ओळखले जाते. त्यानुसार 14 कंपन्यांमधून एका कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे लाभार्थी म्हणून अंबानी कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आली होती. 4 फेब्रुवारी 2019 रोजी आयकर विभागाच्या तपास अहवाल आणि 28 मार्च 2019 रोजी पाठवण्यात आलेल्या नोटीसीच्या माहितीवरून हा खुलासा झाला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजचे वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली. तसेच नोटीस पाठवण्याच्या काही दिवसांपूर्वीच याला फायनस क्लिअरंन्स देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार अॅडिशनल कमिश्नर ऑफ इनकम टॅक्स 3(3), मुंबई यांच्या कार्यालयातून ब्लॅक मनी अॅक्ट 2015 कायद्यांतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे