स्टॉकहोम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजपासून नोबेल पारितोषिक २०२४ च्या विजेत्यांची घोषणा सुरू झाली आहे. सर्वप्रथम आज वैद्यकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर आहे. व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गेरी रुव्हकॉन यांना यावर्षीचा वैद्यकशास्त्रात नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. ते दोन्हीही अमेरिकन शास्त्रज्ञ आहे.
त्यांनी मायक्रो आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकले. वास्तविक, कोरोनादरम्यान पहिल्यांदाच असे घडले जेव्हा मायक्रो आरएनए तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली. अशी लस फायझर, बाय एन टेक आणि मोडेरना यांनी बनवली होती. नोबेल पारितोषिकात ११ मिलियन स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे ८.९० कोटी रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.