रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात तूर खरेदी केंद्राला शेतकर्यांकडून अपेक्षित प्रतिसाद दिसत नसल्याचे दिसून येत आहे.
येथील तूर खरेदी केंद्र सुरु होऊन आठ दिवस उलटले आहे आता पर्यंत ५१ शेतकर्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. राज्य सरकारने तुरीला ५६७५ रुपये भाव दिला असून खाजगी व्यापारी तुरीला ५२०० रुपयां पर्यंत भाव देत आहेत. त्यात मागील वर्षी हेक्टरी १० क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात होती तर यंदा मात्र फॅक्टरी चार क्विंटल ७० किलो प्रमाणे शेतकर्यांकडून तूर खरेदी केली जात आहे त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड निराशा असून हेक्टरची मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.