
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी २१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑगस्टपर्यंत व नंतर ३० ऑगस्ट, त्यानंतर २ सप्टेंबर, व १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.