जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्न होत नसल्याच्या विवंचनेतून एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. या घटनेबाबत दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या तरुणाचे नाव दीपक राजेंद्र पाटील (वय ३५) असून तो कोष्टी गल्ली, अमळनेर येथे राहत होता.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हा तरुण अमळनेर शहरातील गोष्टी गल्लीमध्ये वास्तव्यास होता. विवाह होत नसल्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता. बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घरी कोणीही नसताना त्याने घराच्या छतावरून रूमलाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि गल्लीतील लोकांनी दीपकला खाली उतरवून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे हे करीत आहे.