जळगाव प्रतिनिधी । खान्देशातील चारही लोकसभेच्या जागा भाजप जिंकणार असल्याचा आशावाद व्यक्त करतांना आज एकनाथराव खडसे यांनी ए.टी. नानांसमोर आज भलेही आपले असले तरी विरोधक कोण? असा प्रश्न उपस्थित करताच उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
आज भाजपच्या नियोजीत जिल्हा कार्यालयाच्या स्थळी भारतीय जनता पक्षाचा शक्ती मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांमध्ये चांगलाच जोश निर्माण केला. याप्रसंगी ते म्हणाले की, खान्देशातील चारही जागा भाजपच जिंकणार आहे. त्यांच्यासमोर विरोधकांना उमेदवारच भेटत नाही. रक्षाताईंसमोर कोण उभे आहे हे दाखवा असे ते म्हणाले. आमच्या ए.टी. नानांविरूध्द आमचे असले तरी विरोधक आहे कोण? असा प्रश्न खडसे यांची उपस्थित करताच याला जोरदार दाद मिळाली.
पहा :- एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते !
नाथा भाऊ तुम्ही खरं बोलले होते …. नानांसमोर समोरच्या पक्षा कडे विरोधकच नाहीत पण आपल्यातील असतील …. अन तेच झालं