डॉ केतकी पाटील निर्मित संविधान दिनदर्शिकेचे ना. संजय सावकारेंकडून कौतुक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग मंत्री ना संजय भाऊ सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी संविधान कॅलेंडर भेट दिले. या प्रसंगी ना सावकारे यांनी संविधानाला अंतर्भूत करणारी दिनदर्शिका पाहून कौतुक केले. तसेच डॉ केतकी ताई पाटील यांचे अभिनंदन केले.

संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त संविधान पर्व साजरे केले जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर डॉ केतकी पाटील यांनी संविधान प्रत्येकाला समजेल या स्वरूपात दिनदर्शिकेची निर्मिती करून घेतली. या दिनदर्शिकेवर एक क्यू आर कोड असून ते स्कॅन केल्यावर संविधान पाहिजे त्या भाषेत उपलब्ध होण्याची सुविधा आहे. अशी हि संविधान दिनदर्शिका आज ना संजय भाऊ सावकारे याना स्वतः डॉ केतकी ताई पाटील यांनी दिली. या प्रसंगी गोदावरी फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सुभाष दादा पाटील, सदस्य डॉ अनिकेत पाटील यावेळी उपस्थित होते.

Protected Content