मुंबई (वृत्तसंस्था) कितीही चौकशा केल्या तरी माझे तोंड बंद होणार नाही. मी बोलतच राहणार, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. ईडीने तब्बल साडे आठ तास चौकशी केल्यानंतर घरी आल्यावर राज यांनी प्रसारमाध्यमांना मोजकीच प्रतिक्रिया देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. गुरुवारी (22 ऑगस्ट) अंमलबजावणी संचालनालयाकडून राज ठाकरे यांची तब्बल साडेआठ ते नऊ तास चौकशी झाली. काल सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यात पोहोचलेले राज ठाकरे रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर आले. चौकशीनंतर राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.