Home Cities यावल यावलमध्ये नितिन बानगुडे पाटील यांची उद्या जाहीर सभा

यावलमध्ये नितिन बानगुडे पाटील यांची उद्या जाहीर सभा

0
108

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रचाराचा जोर लावला असून उद्या शहरात भव्य महा रॅली आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा इतिहास अभ्यासक नितिन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, शिवसैनिक आणि महाविकास आघाडी समर्थकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली जात आहे. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ ही मोहीम राबवली जाणार असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच मित्रपक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आघाडीच्या वतीने सर्व समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता श्री मनुदेवी मंदिर, फैजपूर रोड येथून प्रचंड महा रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली भव्य उत्साहात काढली जाणार असून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळेल. रॅलीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यानंतर संध्याकाळी पाच वाजता श्री शिवतीर्थ, बोरावल गेट, यावल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितिन बानगुडे पाटील यांची प्रचंड महासभा होणार आहे. त्यांच्या प्रभावी भाषणशैली आणि इतिहास अभ्यासाच्या आधारे जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या सभांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने यावलमध्येही सभेला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीशी संबंधित मुद्दे, विकासाचे नियोजन, स्थानिक प्रश्न आणि महाविकास आघाडीची पुढील दिशा याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शहर व तालुक्यातील नागरिक, समर्थक आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून उद्याचा दिवस यावलमधील निवडणूक प्रचारासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound