Home Cities मुक्ताईनगर करंजी पाचदेवळी माजी विद्यार्थी सेवा संघाच्या अध्यक्षपदी निळकंठ पाटील

करंजी पाचदेवळी माजी विद्यार्थी सेवा संघाच्या अध्यक्षपदी निळकंठ पाटील


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, करंजी पाचदेवळी येथे आज शुक्रवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि विद्यमान सरपंच नंदलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक सुभाष इंगळे यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची संकल्पना आणि त्यामागील उद्दिष्टे यांची सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सर्वसंमतीने “करंजी पाचदेवळी माजी विद्यार्थी सेवा संघ” ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी निळकंठ तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मिलिंद देविदास सुरवाडे, सचिव म्हणून सुभाष इंगळे, तर कोषाध्यक्ष म्हणून डीगंबर समाधान सूर्यवंशी यांची निवड झाली. सल्लागार सदस्य म्हणून विजय गायकवाड, अश्विन कोळी, दिनकर हरी सोनवणे आणि सुपडू जयराम राऊत यांची निवड करण्यात आली. सर्व माजी विद्यार्थी सदस्य म्हणून सहभागी झाले.

कार्यक्रमात सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थी तथा पोलीस पाटील प्रशांत गजानन पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. त्यांनी आणि त्यांच्या भावाने जीवन गजानन पाटील यांनी आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेच्या व्हरांड्यातील फरशी बदलून नवीन बसविण्याचे जाहीर केले असून, त्यासाठी अंदाजे एक लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

तसेच माजी विद्यार्थी युसुफ पिंजारी आणि मिलिंद सुरवाडे यांनी शाळेला आरओ फिल्टर भेट देण्याची घोषणा केली, तर इतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील लाईट फिटिंग पूर्णपणे नवीन करून देण्याचे ठरवले. मुख्याध्यापक सुभाष इंगळे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमात सूर्यकांत चव्हाण, युवराज शेजोळे, सोपान पाटील, निळकंठ पाटील, नंदलाल पाटील, गोपाळ पाटील, शरद पाटील, पंकज पाटील, वीरेंद्र गायकवाड, डीगंबर सूर्यवंशी, बापू पाटील, सूर्यभान महाजन, वैभव पाटील, प्रशांत सूर्यवंशी, जीवन सूर्यवंशी, राजेश गायकवाड, अमोल कोळी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

नवीन निवड झालेल्या अध्यक्ष निळकंठ पाटील यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी अनिता परमार, विस्तार अधिकारी श्री. नानकर , केंद्रप्रमुख अनिल जाधव आणि मुख्याध्यापक सुभाष इंगळे यांनी केले.


Protected Content

Play sound