जळगाव, प्रतिनिधी | युनायटेड नेशन्स् व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघ यांच्या संयुक्त् विद्यमाने दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या देशातील तसेच देशाबाहेरील व्यक्तींचा कर्मवीर चक्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. जि.प. जळगावचे मुख्य् कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्य्क निलेश मधुकर पालवे यांना नुकतेच कर्मवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नोएडा येथे युनायटेड नेशन्स् चे प्रतिनिधी मार्क परकिनसन यांच्या हस्ते यंदाचा कर्मवीर चक्र पुरस्कार जि.प. जळगावचे मुख्य् कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्य्क निलेश पालवे यांना प्रदान करण्यात आला. पालवे यांनी विद्यार्थी-शिक्षक हजेरी प्रणाली, पालकभेट अभियान, पुस्तकभेट अभियान, ऑनलाईन फाईल ट्रॅकिंग सिस्टीम व इतर नावीन्यूपर्ण उपक्रमांचे माध्यमातून केलेल्या कामगिरीसाठी युनायटेड नेशन्स व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या वतीने पालवे यांची निवड करण्यात आली. नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जि.प. शाळातील विद्यार्थी गैरहजेरीची टक्केवारी २९ टक्यांय्वरुन ४ टक्यांतापर्यंत कमी करण्यात जि.प. जळगावला आलेले यश, पुस्तकभेट अभियानाच्या माध्यमातून जि.प. जळगाव अंतर्गत प्राथमिक शाळांना मिळालेली सुमारे ९ लाख रुपयांची ६५,००० हून अधिक पुस्तके, लोकसहभागातून जि.प. शाळांमध्ये झालेले डिजीटलायजेशन इ. विविध नावीन्यपूर्ण संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात निलेश पालवे यांची मोलाची कामगिरी आहे. विशेष म्हणजे उल्लेखनीय कामगिरीसाठी पालवे यांना यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाच्या इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या वतीने निलेश पालवे यांना गडकरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. श्री. पालवे यांच्या रुपाने हा संपुर्ण जळगाव जिल्हयाचा गौरव असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त् झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.