धरणगाव, प्रतिनिधी | शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली आज रविवार २२ डिसेंबर रोजी काढण्यात आली. या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाब वाघ यांनी सहभाग घेतला होता.
गबानंद चौक- लहान माळी वाडा परिसर प्रभाग क्रमांक ३ येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या प्रचार रॅलीत माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उषा वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, लिला चौधरी, सी.के.आबा पाटील, उद्योगपती जीवन आप्पा बयस, महिला आघाडी शहर प्रमुख रत्ना धनगर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.