स्व. निखिल खडसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

muktainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । स्व निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिना निमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणी येथील “निखिलभाऊ खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना रमेश ढोले म्हणाले, स्व.निखिलभाऊ खडसे यांनी जि.प. सदस्य असताना उत्कृष्ठ कार्य केले. समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. प्रत्येक व्यक्ती सोबत ते कुठलाही अहंकार न बाळगता सदैव जिव्हाळ्याने संवाद साधत असत. त्यांच्यात असलेल्या संघटन कौशल्या द्वारे त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. आमदार एकनाथराव खडसे यांनी स्थापन केलेल्या आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणीचे अध्यक्ष झाल्यानंतर स्व.निखिल खडसे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून सूतगिरणीच्या कामाला गती दिली. त्यांच्या कार्यकाळात सुतगीरणीच्या इमारती व इतर बाबी पुर्ण झाल्या.

परिसरातील युवा वर्ग, महिला यांना परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा, हे निखिल यांचे स्वप्न होते. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर हे काम थांबले होते. त्यांच्या नंतर रोहिणीताई खडसे यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले. आज रोजी सूतगिरणीत जवळपास 400 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यातील जवळपास दोनशे महिला आहेत यातून स्व.निखिल खडसे यांचे परिसरात रोजगार उपलब्ध तेचे स्वप्न साकार झाले आहे. यावेळी दोन मिनिटे मौन बाळगून स्व.निखिल खडसे यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप संघटन सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे, डॉ मनिष खेवलकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, नगराध्यक्ष नजमा तडवी, मुक्ताईनगर पं.स. सभापती शुभांगी भोलाने, बोदवड पं.स. सभापती गणेश पाटील, जि.प. सदस्या वनिता गवळे, वैशाली तायडे, पं.स. सदस्य विकास पाटील, किशोर गायकवाड, राजु सवळे, माजी सभापती राजु माळी, भाजप शहराध्यक्ष मनोज तळेले, दिलीप नाफडे, मधुकर राणे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, सरचिटणीस बी.सी.महाजन, संदिप देशमुख, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, पियुष महाजन, निलेश शिरसाट, बापू ससाणे, प्रवीण पाटील, नंदकिशोर हिरोळे, विक्रम हिरोळे, बाला बोरोले, व्ही.सी.चौधरी, भागवत भोलाने, निलेश मालवेकर, तुकडू घटे, लक्ष्मण भालेराव, संजय चौधरी, विश्वनाथ महाजन, डी.एम. जगताप, पुरुषोत्तम बढे यांच्यासह मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Add Comment

Protected Content