फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या न्हावी गावातील तरुण मित्र मंडळ व भोगे वाडा यांनी आज (दि. 28 जून) रोजी 217 वृक्ष लावण्याचा संकल्प व त्या वृक्षांची संपूर्ण जबाबदारी घेत समाजात चांगला आदर्श निर्माण केला आहे.
यावल तालुक्यात गेल्या वर्षीय दुष्काळ जाहीर केला होता. मात्र यावर्षी थेंब अमृताचा या योजनेमार्फत अनेक गावांमध्ये नद्याखोलीकरण संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यातच एक भाग म्हणून वृक्षारोपणाची सुद्धा यातून जनजागृती व्हावे, म्हणून एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यातच आज (दि. 28 जून) न्हावी गावातून या वृक्ष संवर्धनाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे भक्ती स्वरूपदास शास्त्री, सावदा येथील मानेकर राज शास्त्री, आमदार हरिभाऊ जावळे, मसाका चेअरमन शरद महाजन, न्हावी गावातील सरपंच भारती चौधरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी, प्राध्यापक व.पु. होले, ग्रामपंचायत सदस्य यशवंत पडले, अनिल लढे, नितीन चौधरी, प्रा के.जी.पाटील, मिलिंद चौधरी यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.