जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नशिराबाद बीट येथून विस्तार अधिकारी पदावरून प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाल्याच्या सन्मानार्थ एफ.ए.पठाण साहेब यांचे जळगाव पं.स.गटसाधन केंद्रातर्फे जितेंद्र वाघ व सहकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“स्वयंशिस्त, आज्ञाधारकपणा, कर्तव्यपरायणता व समन्वयशीलता ही प्रशासनाची यशस्वी चतुःसूत्री आहे.” असे मार्मिक प्रतिपादन नवनियुक्त जळगाव पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी एफ.ए.पठाण साहेब यांनी केले. जळगाव पंचायत समिती गटसाधन केंद्रातर्फे प्रभारी गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधिक्षक व गटसमन्वयक यांचा नुकताच हृद्य सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना पठाण बोलत होते. शालेय पोषण आहार अधिक्षक या पदावर खलील शेख यांची नशिराबाद ऊर्दू केंद्रातून विस्तार अधिकारी पदावरून पदोन्नती झाल्याबद्दल एम.आय.एस.कॉर्डीनेटर प्रतिभा पवार, सिमा पाटील, सुचिता मोतिखाये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना खलील शेख म्हणाले की ,”गतिमान प्रशासनात कर्मचारी आणि प्रशासक यांचा वैचारिक व भावनिक समन्वय मोलाचा आहे. समन्वयामुळे कामाने समाधान व मनःशांती मिळते म्हणून सर्व संबधित घटकांचे सहकार्य मिळावे असे भावनिक आवाहन शालेय पोहन आहर अधिक्षक शेख यांनी केले. नवनियुक्त समग्र शिक्षा अभियान गटसमन्वयक जे.जे.चिंचोले यांचा सत्कार आय.ई.डी समन्वयक विलास सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. विस्तार अधिकारी कानळदा बीट येथून पदोन्नती झाल्या प्रित्यर्थ झालेल्या सत्काराला उत्तर देतांना चिंचोले म्हणाले,” गट समन्वयक हे पद साभाळतांना तारेवरची कसरत आहे परंतू कर्तव्य व सेवाभावाची संधी मिळाल्याने या पदाला मी पुरेपूर न्याय देईल.”
सत्कारा प्रसंगी गटसाधन केंद्रातील शाखा अभियंता विलास शिंदे, एम.एस.को ऑर्डिनेटर प्रतिभा पवार, वरिष्ठ रोखापाल संगीता सुरळकर, डाटा एंट्री ऑपरेटर जितेंद्र वाघ, आय.ई.डी.विलास सुर्यवंशी, सुरेश सोनवणे, विषय साधन व्यक्ती सुचिता मोतिखाये, गोपाल शहारे, प्रशांत पाटोळे, नरेंद्र कांबळे, फिरते विशेष शिक्षक सीमा पाटील, मनोज कुमार शेळके, अरुण संध्यान, फिरते विशेष शिक्षक (माध्यमिक ) विलास पाटील, महेंद्रसिग पाटील, उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद जोशी व आभार प्रदर्शन सीमा पाटील यांनी केले.