Home Cities पाचोरा पाचोऱ्यात उद्या नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटील यांचा भव्य सत्कार

पाचोऱ्यात उद्या नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटील यांचा भव्य सत्कार



पाचोरा (प्रतिनिधी) सन २०१९ लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे विक्रमी विजयाचे मानकरी नवनिर्वाचित खासदार जळगाव उन्मेशदादा पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा शहरातील महालपुरे मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार किशोरआप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती राहणार आहे.

 

पाचोरा-भडगाव तालुका महायुतीच्यावतीने २ मे रविवार रोजी दुपारी १ वाजता शहरातील महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या भव्य सत्कार समारंभास मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,बुथप्रमुख नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पाचोरा येथील उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, भडगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, भाजपा जिल्हासरचिटणीस सदाशिव पाटील, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, पाचोरा शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील , भडगाव शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.विलास पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील, भाजपा जि.प.सदस्य मधुकर काटे, वसंत पाटील, तालुका सरचिटणीस भडगाव अनिल पाटील, किशोर बारवकर, पाचोरा शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी, भडगाव शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी,भाजपा शहर अध्यक्ष नंदू सोमवंशी ,भडगाव शहर अध्यक्ष शैलेश पाटील , भाजपा शहर सरचिटणीस नितीन पाटील, पाचोरा युवासेना उपजिल्हाप्रमुख अजय जैस्वाल, युवासेना तालुकाप्रमुख सौरभ चेडे, पाचोरा युवासेना शहरप्रमुख संदीप राजे , पाचोरा शहरप्रमुख अनिकेत (नानू) सूर्यवंशी , भडगाव युवासेना उपजिल्हाप्रमुख बबलू पाटील, भडगाव युवासेना जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, भडगाव युवासेना तालुका प्रमुख रवींद्र पाटील, शहर प्रमुख निलेश पाटील युवासेना आदी मान्यवरांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound